
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोटगे गावची ग्रामपंचायत निवडणूक २०२३ मध्ये झाली. गावच्या सरपंच म्हणून चैताली ढवळ या विराजमान झाल्या. मागील अडीच वर्षे घोटगे सरपंच प्रामाणिकपणे गावचा विकास व गावातील लोकांना रोजंदारी कशी मिळेल यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करत आहेत. घोटगे गाव कसे समृद्ध होईल याकरिता प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तसेच घोटगे सरपंच हे आत्ताच्या युगात सर्व मीडिया व्हाट्सऍप व वेगवेगळ्या प्रकारातून आपल्या गावात येणारे लाभ व विकासकामे प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहेत.
तसेच घोटगे सरपंच यांचे पती चेतन ढवळ यांनी गावातील लोकांना योजना कशा लोकांपर्यंत पोहोचतील व लोकांना त्या योजनेची माहिती मिळण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप बनवून ग्रुपचे नाव “योजना आपल्या दारी” असे ठेवण्यात आले. तसेच या ग्रुपवर प्रत्येक वाडीतील व कामानिमित्त बाहेरगावी मुंबई अशा ठिकाणी असणाऱ्या नागरिकास समाविष्ट करण्यात आले आहेत. या ग्रुपवर मागील अडीच वर्षे या ग्रुपद्वारे जे काय गावातील प्रसंग व लोकहिताची माहिती किंवा समस्या असेल ते लोक मांडतात. यावर सरपंच तत्काळ या ग्रुपच्या माध्यमातून कामे मार्गी लावतात. तसेच मागील १५ दिवसांपूर्वी घोटगे गावातील खालची गुरववाडी येथील अनंत मुरकर यांच्यावर काळाने घाला घातला. यात अनंत मुरकर यांचा मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहत होता. त्याचा २४ मे रोजी रात्री अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. मुरकर कुटुंब यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून वडील पण खूप आजारी असतात. आईची तब्येत वरच्यावर बिघडत असते, असे चारी बाजूने मुरकर कुटुंबाला घेरले होते. पण मुरकर कुटुंबावर जो प्रसंग आला व त्यात त्यांचा मुलगा मृत्यू पावला हे कधीही भरून न काढणारी गोष्ट आहे. घोटगे सरपंच यांनी सहानुभूती दाखविली. चेतन ढवळ यांनी ग्रुपवर मेसेज करून मुरकर कुटुंबाला आपण सहानुभूतीसाठी आपण त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे व आपण सर्वांनी त्यांच्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे असे आवाहन केले. या आवाहनाला गावातील व चाकरमानी मंडळी व मित्रमंडळीने भरभरून प्रतिसाद देत रोख रक्कम रुपये ५६ हजार ७०६ रुपये जमा झाले. ही रक्कम एका व्हाट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून जमा झाली. त्यामुळे मुरकरी कुटुंबीयांना घोटगे सरपंच व गावातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत देण्यात आली. अशा या घोटगे गावातील सर्व दानशूर व्यक्ती व घोटगे सरपंच यांचे कौतुक केले जात आहे.