कुडाळ एसटी बस आगारात दाखल होणार ५ लालपरी

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
Edited by:
Published on: June 08, 2025 13:49 PM
views 197  views

कुडाळ : कुडाळ एस. टी. बस आगारामध्ये नव्या लाल परी गाड्या याव्यात म्हणून गेले अनेक दिवस मागणी होत होती. मात्र आमदार निलेश राणे यांनी ही मागणी काही दिवसातच पूर्ण केली त्यामुळे एस. टी. बस आगाराला सोमवार ९ जून पर्यंत ५ लाल परी गाड्या मिळणार आहेत.

एस. टी. बस महामंडळाने नव्या लाल परी गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केल्या या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, सावंतवाडी या आगाराला मिळाल्या होत्या. या गाड्या कुडाळ आगाराला मिळाव्यात म्हणून मागणी होत होती. याबाबत आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. या गाड्या तात्काळ मिळाव्यात म्हणून आमदार निलेश राणे यांनी प्रयत्न केले आणि लाल परी गाडी कुडाळ आगाराला तात्काळ देण्यात आल्या. या गाड्या सोमवार ९ जून पर्यंत कुडाळ एस. टी. बस आगारात दाखल होणार आहेत. आमदार निलेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या ५ गाड्या उपलब्ध होणार आहेत.