कुडाळ : कुडाळ तालुका शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढी अध्यक्षपदी सुनील नाईक तर उपाध्यक्षपदी वसोली हायस्कूलचे शिक्षक दीपक तारी यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली. यावेळी शिक्षक भारतीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वेतुरेकर,शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद पडते,मावळते अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण,संचालक गिरीष गोसावी यांनी अभिनंदन केले. यानिवडीनंतर सुनिल नाईक आणी दिपक तारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.