कुडाळ विधानसभेसाठी 10 जणांनी घेतलेत उमेदवारी अर्ज

Edited by: संदीप देसाई
Published on: October 24, 2024 14:46 PM
views 625  views

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या ३ दिवसात १० उमेदवारांनी १५ अर्ज घेतले असून मराठा समाज संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या उमेदवाराकडूनही अर्ज घेण्यात आला आहे. तसेच या मतदारसंघातून काँग्रेस पक्षांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीची सुरुवात झाली असून २२ ऑक्टोंबर पासून अर्ज घेणे सुरू झाले आहे गेल्या तीन दिवसांमध्ये १५ अर्ज घेण्यात आले आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी दोन अर्ज शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांनी पाच अर्ज, काँग्रेसचे उमेदवार अरविंद नामदेव मोंडकर, रासप पक्षाकडून उज्वला विजय येळावीकर, बसपा पक्षाकडून रवींद्र कसालकर, महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून  व अपक्ष अनंतराज पाटकर, जरांगे पाटील यांच्या संघटनेकडून प्रशांत नामदेव सावंत, अपक्षांमध्ये सदाशिव आळवे, साईनाथ सावंत यांनी अर्ज घेतले आहेत दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वैभव नाईक यांनी आपल्या दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.