...तर उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावणार

कुडाळात भाजपचा इशारा
Edited by: भरत केसरकर
Published on: February 03, 2024 15:22 PM
views 226  views

कुडाळ : उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप मध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे कुडाळमध्ये येऊन राणेंच्याच्या विरोधात बोलल्यास ते खपवून घेतल् जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

राणेंच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात इथे उद्धव ठाकरे बोलल्यास सभा उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. तशा पद्धतीचे निवेदन सुद्धा आज कुडाळ पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तातही त्यामुळे वाढ करण्यात आली आहे. याबाबत भाजप नगरसेवक निलेश परब यांनी इशारा दिला आहे. तर कुडाळ पोलीस निरीक्षक ॠणाल मुल्ला यांनी बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे सांगितले आहे.