
कुडाळ : 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, कुडाळ' यांच्या वतीने ऐतिहासिक आणि आत्मरक्षणात्मक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'शिवकालीन लाठीकाठी प्रशिक्षण शिबीर' आयोजित करण्यात आले आहे. आज पासून सुरू होणाऱ्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबिराचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत. कालावधी: १९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ (७ दिवस). वेळ: दररोज संध्याकाळी ५:०० ते ६:३० या वेळेत. ठिकाण: साने गुरुजी वाचनालय मैदान, श्री देव कुडाळेश्वर मंदिराजवळ, कुडाळ. वयोगट: ६ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील नागरिक यात सहभागी होऊ शकतात.
प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांनी आपल्यासोबत वेताची किंवा बांबूची काठी, पाण्याची बाटली आणि रुमाल सोबत आणणे आवश्यक आहे. या शिबिराबाबत अधिक माहिती हवी असल्यास किंवा नोंदणी करायची असल्यास इच्छुक नागरिकांनी श्रीकृष्ण शिरोडकर यांच्याशी ९८६०५५५९०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. ऐतिहासिक वारसा असलेल्या लाठीकाठी विद्येचा सराव आणि आत्मरक्षणाची कौशल्ये शिकण्यासाठी कुडाळ परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे संयोजकांकडून कळवण्यात आले आहे.










