'कोकणसाद'च्या विस्तारित कार्यालयाचा शानदार शुभारंभ

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 19, 2026 22:11 PM
views 105  views

सावंतवाडी : कोकणातील प्रिंट, टीव्ही तसेच डिजिटल माध्यमात यशस्वी वाटचाल करत असलेल्या "कोकणसाद" माध्यम समूहाने  रविवारी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन विस्तारीत नव्या कार्यालयाचा शानदार शुभारंभ केला आहे. या विस्तारित कार्यालयाच्या शुभारंभ कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 


सावंतवाडी येथील हरिप्रिया अपार्टमेंट, एस.टी. बसस्थानकाजवळ कोकणसाद माध्यम समुहाच्या प्रधान कार्यालय कार्यरत असून नुकतीच कोकणसाद LIVE ने १२ वर्षांची माध्यम समूहातील यशस्वी वाटचाल पुर्ण केली. रविवारी दैनिक कोकणसादच्या प्रिंट विभागाचे कामकाज नव्या विस्तारित कार्यालयातून करण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रधान कार्यालयाच्या वरील मजल्यावर या विस्तारित कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे कोकणसादच्या प्रिंट, टीव्ही तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामकाज अधिक व्यापक आणि प्रभावीपणे आणि तितक्याच गतिमानतेने पुढे जाणार आहे. याच विस्तारित कार्यालयाचा दमदार शुभारंभ रविवारी झाला. यावेळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब व सौ. कृपाली परब यांना पूजेचा मान देण्यात आला. पुरोहितांच्या उपस्थितीत ही सत्यनारायण महापूजा पूजा पार पडली.

याप्रसंगी संपादक संचालक संजय ढवळीकर, 'कोकणसाद'चे संपादक संदीप देसाई, मार्केटिंग हेड समीर सावंत, चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम, यांसह कोकणसाद टीमचे सहकारी उपसंपादक लक्ष्मण आढाव, जुईली पांगम, भगवान शेलटे, यांसह रिपोर्टर श्रीधर साळुंखे, विनायक गावस, स्वप्नील वरवडेकर, उमेश बुचडे,लवू परब, निलेश ओरोसकर, नागेश दुखंडे, विनायक गावस, वितरण प्रतिनिधी अशफाक शेख, आय टी चे विद्येश धुरी, कॅमेरामन साहिल बागावे व साहिल दहिबावकर, अकाउंटट ओंकार नाईक, प्रसाद कदम, तन्वी आकेरकर, विनायक खोटलेकर, रविकिरण राणे, अविनाश बांदेकर, मयुरेश राऊळ आदींसह टीम कोकणसाद उपस्थित होती‌.


कोकणसाद LIVE आणि दैनिक कोकणसाद च्या माध्यमातून कोकणातील घडामोडींना न्याय देत समाजातील विविध प्रश्न, स्थानिक घडामोडी, सांस्कृतिक उपक्रम आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने प्रकाश टाकला असून वेळोवेळी थेट ग्राउंडवर उतरून कोकणवासियांचा हक्काचा आवाज बनण्याचे काम ही केले आहे. कोकणी जनतेच्या विश्वासाच्या जोरावर कोकणवासीयांचा आवाज बनत पुढील वाटचाल अधिक जोमाने करण्याचा निर्धार करत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुढचं पाऊल टाकल. या विस्तारीत कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, हॅलो सिंधुदुर्गचे संपादक सागर चव्हाण, कंत्राटदार शाहबाज शेख, निहार ढवळीकर, शलाका ढवळीकर आदींनी उपस्थित राहत टीम कोकणसादला शुभेच्छा दिल्या. 


दरम्यान, या प्रवासात वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, वितरक तसेच सदिच्छादूत यांचे मिळालेलं प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद हीच 'कोकणसाद'ची खरी ताकद असल्याचे मत संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. या पाठबळामुळेच कोकणसादने आपल्या माध्यम सेवेचा विस्तार केला असून कोकणसादच्या वाटचालीत एक नवा टप्पा सुरू झाला आहे. भविष्यात अधिक दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देत कोकणवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम टीम कोकणसाद आता अधिक जोमाने करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.