
कुडाळ : देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित जिल्ह्यातील समाज बांधवांचा मेळावा रविवार दिनांक 10 मे रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल (पंचायत समिती नजीक) आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवळी समाज ज्ञातीतील वधू वर सूचक मेळावा, ज्ञातीतील दशावतार मंडळांचा सत्कार, डॉक्टर्स, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच समाजातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गची विशेष बैठक कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष राजन नाईक, सचिव विष्णू चौकेकर, उपाध्यक्ष, रमेश नरसुले, कार्यकारिणी सदस्य, संतोष देऊलकर, अनघा तेंडोलकर, मयुर आरोलकर, भास्कर केरवडेकर, नागेश ओरोसकर, रमेश पिंगुळकर, शेखर तुळसकर, अनिल तोंडवळकर, मंडळाचे सल्लागार हरी उर्फ बाळा कनियाळकर, श्रीकृष्ण तळवडेकर, आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी समाज बांधवांना संघटित करून समाज बांधवांची एकमेकांशी ओळख व ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील समाज बांधवांची आजीव सभासद नोंदणी करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हितवर्धक मंडळाच्या वतीने बैठका घेऊन प्रत्येक गावातील समाज बांधवांना संघटित करण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष राजन नाईक यांनी दिली. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी अध्यक्ष राजन नाईक मो.9421235300, व रमेश उर्फ विष्णू चौकेकर यांच्याशी संपर्क साधावा.










