कुडाळमध्ये सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी सिताराम तेली यांची वर्णी निश्चित

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 09, 2026 13:01 PM
views 296  views

कुडाळ :  कुडाळ पंचायत समितीच्या सत्तेच्या समीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, येथे महायुतीचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रक्रियेत सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक आणि उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांची नावे निश्चित झाली असून, थोड्याच वेळात त्यांचे अधिकृत अर्ज दाखल केले जाणार आहेत. कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहात (रेस्ट हाऊस) महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांच्या नजरा आमदार निलेश राणे यांच्याकडे होत्या. चर्चेनुसार, आमदार राणे यांनी आणलेल्या 'लिफाफ्यातून' सभापतीपदासाठी मिलिंद नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी आणि सत्तेचे संतुलन टिकवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर ही रणनीती आखण्यात आली आहे. सभापतीपद: मिलिंद नाईक (शिंदे शिवसेना), उपसभापतीपद: सिताराम तेली (भारतीय जनता पक्ष)

गेल्या काही दिवसांपासून कुडाळ पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आज झालेल्या निर्णयामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार काही वेळातच आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निवडीमुळे कुडाळच्या स्थानिक राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे.