कुडाळमध्ये ८ मार्चला घुमणार स्त्री शक्तीचा जागर

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भव्य सोहळ्याचे आयोजन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 06, 2026 13:16 PM
views 62  views

कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ९ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत कुडाळ पोस्ट ऑफिसजवळील श्री सिंधुदुर्गचा राजा मैदान येथे हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाची माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जि.प. सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते यांनी कुडाळ येथील महायुती संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. महिला ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण आणि निमंत्रित ग्रुप डान्सचा नृत्याविष्कार होणार आहेत. 

पाककला स्पर्धा: नाचणीचे पदार्थ (कृतीसह).

उखाणे स्पर्धा व प्रश्नमंजुषा.

खेळ पैठणीचा: प्रथम क्रमांक - पैठणी, द्वितीय - सोन्याची नथ, तृतीय - चांदीचा करंडा.

सन्मान सोहळा: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला जाणार आहे. हळदीकुंकू समारंभ (सर्व महिलांना सौभाग्यवाण भेट), खाऊगल्ली, शॉपिंग स्टॉल्स आणि रात्री होणारी भव्य फटाक्यांची आतषबाजी. उपस्थित महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून, यामध्ये मिक्सर, पंखा, इलेक्ट्रिक केटल आणि कढई यांसारखी घरगुती उपकरणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क:

पाककला स्पर्धा: रेवती राणे (९४२२३७९६१२) व रेखा काणेकर (९७६५२३११४३).

उखाणा स्पर्धा: चांदणी कांबळी व श्रुती वर्दम.

या पत्रकार परिषदेला नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, रेवती राणे, जि.प. सदस्य दादा साईल, शहरप्रमुख अभी गावडे, चेतन पडते यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कुडाळ-मालवण मतदारसंघातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीपलक्ष्मी पडते यांनी केले आहे.