
कुडाळ : रूर गावानेच ठरवल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. सध्या होणारे पक्षप्रवेश हे केवळ बड्या नेत्यांना खुश करण्यासाठी केले जात आहेत," असा घणाघाती आरोप शेखर गावडे यांनी केला. नेरूर पंचक्रोशी आघाडीचे उमेदवार रुपेश पावसकर यांच्या समर्थनार्थ त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना शेखर गावडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, लोकांनी आता मनावर घेतले असून स्थानिक उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रतिस्पर्धी पक्षात जे प्रवेश होत आहेत, त्यामागचे कारण लोकांना चांगलेच ठाऊक आहे. हा सर्व प्रकार केवळ नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी सुरू असून, 'उगवत्या' पक्षाकडून हे प्रवेश झालेले नाहीत, असे गावडे यांनी स्पष्ट केले. विरुद्ध बाजूला शिंदे सेनेकडून संजय पडते हे उमेदवार आहेत. त्यांना असे झाल्यास ही निवडणूक काहीशी चुरशीची आणि त्रासदायक ठरू शकते.
सर्व नेरूर ग्रामस्थ आणि आम्ही सर्वजण रुपेश पावसकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. गावाची एकजूट आणि लोकांचा पाठिंबा पाहता आमचा विजय पक्का आहे. या पत्रकार संवादादरम्यान उमेदवार रुपेश पावसकर, शेखर गावडे, मंजुनाथ फडके, गोठू नाईक, सुरेंद्र घाडीगावकर, सतीश सावंत, देविदास नाईक, प्रवीण नेरुरकर, संतोष कुडाळकर, कृष्णा तेली, दीपक सावंत, सुचित्रा नेरुरकर, भाई नाईक, ऋचा पावसकर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.










