
सावंतवाडी : लाखे वस्ती सावंतवाडी येथील श्री रासाई युवा कला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षपदी कृष्णा लाखे तर उपाध्यक्षपदी विकी लाखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
यावेळी खजिनदार लखन पाटील, उप-खजिनदार अंकुश लाखे, सचिव नितीन पाटील, कार्याध्यक्ष रोहित लाखे तर सदस्य गणेश खोरागडे, संजय खोरागडे, सुनिल लाखे, प्रवीण लाखे, दिपक लाखे, गणेश पाटील, अनिता लाखे, सागर लाखे, मनोज लाखे यांचीही निवड करण्यात आली. लाखे वस्तीमधील प्रलंबित कामे लवकरात लवकर मंडळाकडून पूर्ण केली जातील असे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री कृष्णा लाखे यांनी आश्वासन दिले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.