कोकणसाद LIVEची फोटोग्राफी स्पर्धेची अंतिम तारीख वाढविली !

25 फेब्रुवारी पर्यंत पाठवणार येणार फोटो
Edited by: जुईली पांगम
Published on: February 20, 2024 11:20 AM
views 502  views

सिंधुदुर्ग : तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे का ? तर ही बातमी तुमच्यासाठी...कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE च्यावतीने खास फोटोग्राफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कोकणसाद LIVE च्या 10 व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही 'बदलतं कोकण' ही खास थीम आहे. 'बदलत्या कोकण'चं अनोखं सौंदर्य टिपणारा आकर्षक असा फोटो काढायचा आहे. तर विजेत्यांना आकर्षक बक्षीसं मिळणार आहेत. वाढत्या प्रतिसादामुळे स्पर्धेत सहभागाची अंतिम तारीख वाढविण्यात आलीय. 25 फेब्रुवारी पर्यंत फोटो पाठवता येणार आहेत. 

कशी असेल स्पर्धा ?

कोकणसाद LIVE च्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे ही स्पर्धा खुली आहे. वयाची कोणतीही अट नाही. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील स्पर्धेक यात सहभागी होऊ शकतो. 'बदलतं कोकण' या आमच्या थीमला साजेसा फोटो असावा. चांगली क्वाॅलिटी सुद्धा आवश्यक आहे. एकच फोटो पाठवावा. हे फोटोज 7720096037 या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावेत. फोटो पाठवताना पूर्ण नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर याची माहिती असणे आवश्यक आहे. फोटो पाठवण्याची 25 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. 

आकर्षक बक्षीसं !

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसंही मिळणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्यास 3000 रु. आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्यास 2000 आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्यास 1000 रु. आणि सन्मानचिन्ह अशी बक्षीस असणार आहेत. 

सावंतवाडी भोसले नॉलेज सिटी इथं होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात तुमच्या फोटोजचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता आमच्या फोटोग्राफी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE च्यावतीने करण्यात आलंय. क्रिएटीव्हीटीला चालना द्या...फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी व्हा....


टीप : सर्व अधिकार आणि अंतिम निर्णय कोकणसाद LIVE कडे राहील