
देवगड : ४ ऑगस्ट २०२० रोजी चिलखती तटबंदीच्या कोसळलेल्या भिंतीच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे विजयदुर्ग उपमंडल प्रमुख राजेश दिवेकर यांनी पुन्हा हा पदभार स्वीकारल्यानंतर गेली 3 वर्षे पडलेली ही तटबंदी आता नव्याने उभी राहत आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या तटबंदीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत असून
४ ऑगस्ट २०२० रोजी वादळी पावसामुळे आणि समुद्राच्या उधाणामुळे किल्ल्याची दुसरी चिलखती तटबंदी हिचा काही भाग कोसळला होता. तटबंदीचा मोठा भाग जमीनदोस्त झाला होता. विजयदुर्ग किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्याने मोठ्या प्रमाणात सुस्थितीत असलेला हा गड राखणे विजयदुर्गवासीय आणि इतिहास प्रेमींना गरजेचा वाटतं. आज ही तटबंदी उभारली जात असल्याने विजयदुर्गवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. या ऐतिहासिक वास्तूचे काम करण्यासाठी कर्नाटकातील हंपी, कठ्ठकली, तामिळनाडूतील तंजावर येथील कारागिर तत्कालीन बांधकाम करण्यात तरबेज असतात. दरम्यान, बदामी येथील त्या दर्जाचे कामगार या तटबंदीवर काम करत असून ही तटबंदी पुन्हा दिमाखात उभी राहील असा विश्वास विजयदुर्ग उपमंडलाचे प्रमुख राजेश दिवेकर यांनी व्यक्त केला.