
सावंतवाडी : गौराईच्या पुजेनंतर ओवसा देण्याची परंपरा आहे. पाचव्या दिवशी इन्सुली कोठावळेबांध येथे ओवसा देण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सहभागी झाल्या. सुवासिनींनी एकमेकींना ओवसा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सावंतवाडी मतदारसंघात घरोघरी जात गणेश दर्शन घेतले. पाचव्या दिवशी गौराईच्या आगमनानंतर ओवसा देण्याच्या सुवासिनींच्या कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. इन्सुली कोठावळेबांध येथील महिलांसोबत त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. येथील तेविस कुटुंबांच्या गणेशाचे विशेष म्हणजे एकाच रंगांच्या दोन गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. या गणरायाचे दर्शन अर्चना घारे-परब यांनी घेतले. आजच युग विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळताना कोकणात मात्र एकत्र कुटुंब पद्धती अबाधित आहे. सण, समारंभ एकोप्याने साजरे करतात. घरोघरी गोकुळ नांदतात ही बाब कौतुकास पात्र आहे. पुढची पिढी देखील त्याचा सांभाळ करत आहे हे विशेष आहे. आजही पुर्वजांनी घालून दिलेल्या चालिरीती, परंपरा आमचे बांधव-भगिनी जपत असल्याचा कोकणची कन्या म्हणून सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन अर्चना घारे-परब यांनी केले. यावेळी कोठावळे परिवार उपस्थित होता. तसेच आजगाव पांढरेवाडी येथील चाळीस कुटुंबियांच्या सामाईक गणेशाचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी विष्णू पांढरे, विनोद पांढरे, नाना गोवेकर, ओमकार गोवेकर, दादा गोवेकर आदी उपस्थित होते.