गोष्ट कोकणातल्या आगळ्यावेगळ्या लग्नाची

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 03, 2025 13:00 PM
views 239  views

कुडाळ : ​कोकणातील एका महत्त्वपूर्ण आणि पारंपारिक सणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील परबवाडीने यंदा एक नवा आणि प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. तुळशी विवाह या पारंपरिक सणाचे महत्त्व जपत असतानाच, येथील गावकऱ्यांनी वराला (श्रीकृष्णाचे प्रतीक) चक्क खऱ्या नवरदेवाप्रमाणे मान-सन्मान देऊन त्याचा विवाह सोहळा अविस्मरणीय केला. हा आगळावेगळा तुळशी विवाह संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.

​कोकणात तुळशी विवाहानंतर खऱ्या अर्थाने जत्रा आणि लग्नसराईला सुरुवात होते, त्यामुळे या सणाचे महत्त्व मोठे आहे. दरवर्षीप्रमाणे परबवाडीतील गावकरी या सोहळ्यासाठी एकत्र आले. मात्र, यंदा या सोहळ्याला एक वेगळी दिशा देण्याची संकल्पना बाळा देसाई यांनी मांडली.

​नवरदेवाप्रमाणे वराचं स्वागत, ओव्या गाऊन मान-सन्मान

​बाळा देसाई यांच्या संकल्पनेतून, तुळशी विवाहासाठी आलेल्या वराला (नवरा मुलगा वेदांत परब) चक्क खऱ्या नवरदेवाप्रमाणे वागणूक देण्यात आली.​वराचे आगमन नाचत-गात मोठ्या उत्साहात मांडवात झाले.गावातील महिलांनी खास ओव्या गाऊन वराचा सन्मान केला.

​जसा मान-सन्मान आणि प्रेम खऱ्याखुऱ्या लग्नात वराला मिळतो, तसाच मान यावेळी वराला देण्यात आला. ​यावेळी उपस्थित असलेल्या गावकरी मंडळींनीही या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर, पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टका होऊन तुळशी आणि वराचा विवाह सोळहा मोठ्या आनंदात आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

​गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

​या अनोख्या आणि उत्साही सोहळ्यात परबवाडीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आयोजनात परेश परब, नेहा परब, जीजी परब, मदन परब, भाली परब, संदेश परब, सदानंद परब, राजन परब, पंकज परब, शंकर परब, सूर्याजी परब यांसह प्रकाश देसाई, ओरोसच्या माजी सरपंच प्रीती देसाई, सायली परब, जान्हवी परब, वैशाली परब, दीपक परब, भास्कर परब, चेतन परब, भावेश परब, अक्षय परब, सर्वेश परब, क्षितीज परब, सोहम परब आणि किलबिल पार्टी या सर्वांचे सहकार्य लाभले.

​परंपरेला आधुनिकतेची आणि उत्साहाची जोड देणाऱ्या या सोहळ्यामुळे ओरोस-परबवाडीने तुळशी विवाह साजरा करण्याच्या पद्धतीत एक नवा अध्याय जोडला आहे.