‘कोकणचा राखणदार’ स्पर्धा

कोकणचं कोकणपण जपणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
Edited by:
Published on: May 16, 2025 20:02 PM
views 30  views

सिंधुदुर्ग : कोकणची जैवविविधता, निसर्गसंपन्नता आणि शाश्वत जीवनशैली जपणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी ‘कोकणी रानमाणूस’ संस्थेतर्फे ‘कोकणचा राखणदार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे प्रमुख आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रवर्तक प्रसाद गावडे यांच्या पुढाकारातून ही चळवळ उभी राहत आहे. या स्पर्धेची पहिली श्रेणी “गावठी फळांच्या राई” या विषयावर आधारित आहे. ज्या व्यक्तीकडे किंवा गावात सर्वाधिक गावठी फळझाडांची राई (fruit forest) आहे, अशांचा या श्रेणीतून सन्मान करण्यात येणार आहे.

‘कोकणचा राखणदार’ उपक्रमांतर्गत पुढील श्रेणी क्रमशः जाहीर केल्या जाणार आहेत :

औषधी व मसाल्याचे झाडं असलेले जंगल

स्थानिक फुलझाडांची राई

सर्वोत्तम व्यवस्थापन केलेली देवराई

नितळ नदी असलेले गाव

मोठा घेर असलेला प्राचीन वृक्ष

पारंपरिक मातीचे घर

स्थानिक मंदिर/प्रार्थनास्थळ

पारंपरिक मासेमारी करणारे गाव

सर्वाधिक जैवविविधतेचे जंगल

गावठी बियाणे जपणारे शेतकरी

पारितोषिके:

प्रथम क्रमांक: ₹५,००० व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक: ₹३,००० व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक: ₹२,००० व सन्मानचिन्ह

या स्पर्धेमागचा उद्देश कोकणातील नैसर्गिक व सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या माणसांचा सन्मान करणे आणि स्थानिक निसर्गश्रीमंतीचे मापक समाजासमोर मांडणे हा आहे.

या स्पर्धेच्या नोंदणीसाठी तन्मय गावडे : 9082227929, अंजली शिर्के: 8104837164 यांच्याशी  संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ‘कोकणी रानमाणूस’ यूट्यूब चॅनेलवर पाहावा असही आयोजकांकडून सांगण्यात आलंय.