दुग्ध उत्पादन चळवळीत कोकणास राज्यात पहील्या क्रमांकावर आणणार : प्रशांत यादव

Edited by:
Published on: April 04, 2025 18:30 PM
views 147  views

मंडणगड : दुग्ध उत्पादनाचे चळवळीत कोकणास राज्यात पहील्या क्रमांवर आणण्याचा संकल्प असून वाशिष्ठी डेअऱीच्या रुपाने रत्नागिरी जिल्ह्यात सहकारी तत्वावर उभ्या रहात असलेल्या दुध उत्पादनाचे चळवळीत मंडणगड तालुक्याने अतिशय महत्वपुर्ण योगदान दिलेले असल्याने प्रतिपादन वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट्स प्रायेव्हेच लिमेटेड चे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी तिडे येथे केले. वाशिष्ठ मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्ट व क्रीमसन सॉईल अँग्रो यांच्यावतीने 4 एप्रिल 2025 रोजी तिडे येथे आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बोलताना पुढे म्हणाले दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादने यशस्वी झाल्यानंतर प्रगतीच्या पुढच्या टप्यात मंडणगड तालुक्याची भुमीका आणखीनच महत्वाची राहणार आहे.

दुग्ध उत्पादन व विक्रीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आणखीन जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत त्याकरिता दुग्ध उत्पादक शेतकरी व नव्याने या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्याचे पाठीमागे कंपनी ठामपणे उभे आहे दुधाचे वाढलेले उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी ओला चाऱ्याची गरज लक्षात घेऊन पशुधनासाठी आवश्यक असलेला ओल्या चाऱ्याचे निर्मीतीचा पहीला प्रयोग मंडणगड तालुक्यात ओसाड जमीनीवर पंचवीस एकर क्षेत्रावर यशस्वी केला आहे.  कोकणास दुग्ध उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा संकल्प असुन त्या दृष्टाने तरुण व नवयुवकांनी या व्यवसायाकडे वळावे याकरिता शक्य ती सर्व मदत कंपनी करीत आहे पंरतू व्यवसायाचे वाढते आय़ाम लक्षात घेता बँका व राजसत्तेच्या पाठबळाची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

दुधाची वाढती मागणी व आगामी काळातील विस्तार लक्षात घेत मुंबई पुणे या महानगरांचे जवळचे अंतर लक्षात घेता आगामी काळात केवळ दुध संकलनापुरते मर्यादीत न राहते पुर्ण प्रकल्प मंडणगड येथे कार्यान्वीत करण्याचा सुतोवाच यावेळी केला याचबरोबर दुध संकलन केंद्रावर चारा विक्री व शेतकऱ्यांची पशुधनाशी संबंधीत वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नियुक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगीतले. यावेळी र.जि.म.स. बँकेचे संचालक रमेश दळवी, तिडे ग्रामपंचायतीच्या सरपंच मुमताज धनसे, कादीवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद माने, उपसरपंच राजेश जाधव, नानु खैरे, संतोष राणे, निखील दळवी, संकेत घोसाळकर शिवाजी माने, विजय खैरे, मोहन दळवी, व तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱी उपस्थित होते.