
संगमेश्वर : पेढांबे कोंडाचीवाडी येथील कोयना भूकंप योजने अंतर्गत मंजूर सभागृहाचे भूमिपूजन, नुुकतेेच चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले, पेढांबे गावाकरिता विविध विकासाची कामे करीत असताना कोंडवाडीच्या सभागृहाची मागणी ग्रामस्थांनी केली आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे भाग्य आपल्याला लाभले. यापुढेही वाडीतील सोयी सुविधांसाठी तसेच सभागृहाच्या कामकाजासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द दिला. आपल्याार विश्वास ठेवून पाठीमागे उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना पेढांबे गावचे माजी सरपंच व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस गजाभाऊ सुर्वे म्हणाले, आमदार शेखरसरांनी, आमदार नसतानाच्या काळामध्ये विधान परिषदेच्या आमदाराच्या माध्यमातून तसेच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्याचीच पोचपावती म्हणून सरांना पेढांबे गावाने मोठ्या प्रमाणात मताधिक्य 2019 च्या निवडणुकीमध्ये दिले होते. आता शेखरसर स्वतः आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विविध कामही होत आहेतच. गावामध्ये विविध विकास काम मंजूर झाली आहेत किंवा काही कामे पूर्णत्वास गेली आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांना जास्तीचे मताधिक्य देण्याचं काम पेढांबे गावातून केले जाईल असा शब्दही दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे चिटणीस गजाभाऊ सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे युवकचे उपाध्यक्ष सुशील भायजे, संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणपत चव्हाण, धामापूरचे तंटामुक्ती अध्यक्ष लहू सुर्वे, सुरेश रामाणे, वैभव मते, कृष्णा येलवंडे जगन्नाथ सावटकर, किसन मते, विजय मते, लहू सावरकर, सुप्रिया सुर्वे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.