कोमसाप सावंतवाडीतर्फे ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांचं अमृतमहोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 29, 2023 15:06 PM
views 139  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मालवणी कवी, गीतकार दादा मडकईकर यांचे ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. ज्येष्ठ इतिहासकार व साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा यांच्याहस्ते दादा मडकईकर यांचे पुष्पगुच्छ, फ़ुलहार तसेच ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच पेढे भरवत त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जिल्हा शाखेचे खजिनदार भरत गावडे, सदस्य कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सावंतवाडी कोमसाप शाखेतर्फे लवकरच दादा मडकईकर यांच्या मालवणी कवितांचा रंगारंग कार्यक्रम घेण्याचा संकल्पही सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.