
दोडामार्ग : पडवे माजगाव कोलझर ते पंणतुर्ली रस्त्यांचे अर्धवट राहिलेले काम येत्या 25 मे पर्यंत पुर्ण करण्यात येईल असे लेखी पत्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागाचे अभियंता जी.एस. चव्हाण यांनी दिले. कोलझर पंचक्रोषीतील ग्रामस्थानी रखडलेल्या रस्ता कामा विरोधात आंदोलन छेडल्यानंतर हे आश्वासन प्रशासनानं दिल्याने तात्पुरती उपोषण स्थगित केले असल्याची माहिती उपोषणकर्ते श्यामराव देसाई व शिरिष नाईक यांनी दिली आहे.
पडवे माजगाव ते कोलझर पंणतुर्ली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्सा डांबरीकरण मंजूर करण्यात आला होता.मात्र रस्तांचे काम अर्धवट होते. ते पुर्ण करण्यासाठी बुधवारपासून कोलझर शहीद जवान चौकात ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. उपोषणाला दुपारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता जी. एस. चव्हाण, राजेंद धरणे व ठेकेदार यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. कामाची मुदत संपत आली तरी रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण होत नाही याला आपले खाते जबाबदार असून या सुशेगात भूमिकेमुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. काहि ठिकाणी अर्धवट खडीकरण करण्यात आले. कामामध्ये कोणतीही सुधारणा नाही, साइटचे गटार बांधकाम करण्यासाठी खोदाई करुन ठेवली आहे. सर्व कामे अर्धवट आहे. काम करणारा ठेकेदार काम सोडून पळाला. याला जबाबदार कोण असे प्रश्न विचारुन अभियंता श्री. चव्हाण यांना उपोषणकरते यांनी धारेवर धरले. यावेळी रस्ता आता पुर्ण होणार नाही, खोदकाम केलेली कामे व गटार पुर्ण करुया असे चव्हाण यांनी अशी भुमिका घेतली. याला ग्रामस्थांनी याला विरोध करत रस्ता पुर्ण डांबरीकरण करावा, रस्ता पुर्णपणे खराब झाला आहे, दोन वर्षे रस्ता करतात, याला जबाबदार तुम्हीच आहात. आम्हाला रस्ता डांबरीकरण पाहिजे, उपोषण मागे घेणार नाही अशी आक्रमक भुमिका घेत शामराव देसाई, अमित सावंत यांनी खडसावून सांगितले. त्यामुळे अखेर २५ मे पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याचे लेखी पत्र श्री. चव्हाण यांनी दिले. काम पुर्ण न झाल्यास उपोषण पुन्हा करण्यात येणार असे शिरिष नाईक यांनी सांगितले व ग्रामस्थांच्यावतीने तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आले.
या उपोषणाला नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी उपोषणाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थ श्यामराव देसाई, शिरिष नाईक, संजय देसाई , प्रशांत देसाई , सिध्देश देसाई , सरपंच सुजल गवस, उपसरपंच समिधा गवस, कुब्रंल उपसरपंच अमित सावंत, अंनत गवस, दिपक देसाई, दिपक विश्वास देसाई, आंनद परब, दौलत देसाई, भिकाजी जोशी, समीर गवस, सुशांत बोंद्रे, उदय देसाई, विकास सावंत, श्रीराम देसाई, गीतांजली देसाई, सावीत्री देसाई, मधूकर देसाई,अमर सावंत, विनायक देसाई, मुकूंद देसाई, पांडुरंग राणे, प्रीया देसाई, उर्मिला देसाई, शुभाष गवस, चंद्रकांत देसाई, गोपाळ परब, विष्णू नाईक, दिलीप देसाई, उदय देसाई, प्रविण परब, सुयकांत गवस,विकास देसाई, पेंदू फर्नांडिस, निलेश चव्हाण, बाळकृष्ण देसाई, विशाखा देसाई, रोहन देसाई, चंद्रकांत नांगरे,शंकर देसाई, गुरुनाथ बोंद्रे, संजय श.देसाई आदी ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते.