
सावंतवाडी : कोलगाव येथील युवक अक्षय साहिल या युवकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते तथा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी नुकतीच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत पोलिस अधिक्षकांची भेट घेत संबंधित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावी अशी मागणी केली आहे.