
कणकवली : जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी कणकवली पंचायत समितीला भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विभाग, डेमो हाऊस तसेच बचतगट माल विक्री केंद्र (उमेद मॉल) आदीला भेट देत पाहणी केली.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, उपअभियंता घेवडे, उपअभियंता अनिल भोसले, पशुधन विकास अधिकारी डॉ. लोखंडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण, अधीक्षक मनीषा देसाई, कृषी अधिकारी भरसट, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कवटकर, गणेश कडुलकर उपस्थित होते.