
मंडणगड : कलगी तुरा सांस्कृतीक शाहिरी कला मंडळ रायगड रत्नागिरी रजि. मंडळाच्यावतीने 15 जून 2025 रोजी तमाशा व गौरी गणेश जाखडी नाच ही लोककला जतन करुन तिचे रंगामंचावर सादरीकरण करणाऱ्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील एकूण 53 कला मंडळांचा सन्मान सोहळा श्रीकृष्ण सभागृह भिंगळोली या ठिकाणी संपन्न झाला.
कलगी तुरा मंडळाच्यावतीने कलाकारांना प्रोत्साहन व ही कोकणची पांरपारीक लोककला अधिक वृध्दींगत या उद्देशाने वर्षभरात कार्यक्रम सादर करणाऱ्या मंडळांना सन्मानीत करण्यात येते त्यासाठी विविध स्पर्धा, व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सन 2024 /25 या वर्षामध्ये रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील सोळा तमाशा मंडळांनी चैत्रा महिन्यातील देवदेवतांच्या जत्रोत्सावात डबलबारी तमाशा सादर करुन रसिकांचे मनोरंजन केले तसेच जाखडी नृत्य स्पर्धा व डबलबारी कलगी तुरा कार्यक्रमांमधून 25 तरुण नाच मंडळांनी व 12 चाळीस वर्षावरील नाच मंडळांनी आपली कला सादर केली या सर्व कलामंडळांना सन्मापत्र, सन्मानचिन्ह व कलामंडळातील सर्व कलाकारांन प्रशस्तिपत्र देऊन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात गौरविण्यात आले. झालेल्या सन्मानसोहळ्याने कार्यक्रमास उपस्थित शाहीर भारावून गेले.
कलगी तुरा सांस्कृतीक शाहिरी कला मंडळाचे अध्यश्र राम टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास शिवसेना युवासेना राज्य कार्यकारिणी कोवर कमिटी मेबर विकास गोगावले, माजी जि.प.सदस्य जितू सावंत, सुहेब पाचकर, कलगी तुरा समन्वय समिती रायगड रत्नागिरीचे अध्यक्ष सुरेश महाबळे, शंभू राजू घराणे अध्यक्ष रमेश घडवले, गुरु गणपती घराणे प्रमुख रामचंद्र म्हात्रे, भानुदास घराणे प्रमुख राम टेंबे, सदालाल घराणे प्रमुख किसन बाटे, ताडदेव घराणे प्रमुख सुरेश महाबळे, रामचंद्र पंडीत घराणे प्रमुख प्रकाश कळंबे, शंकर तुरडे, प्रल्हाद शिरशिवकर, अंकुश जाधव, सहदेव उत्तेकर, गुरुवर्य पांडुरंग नांदवीकर, नथुराम पाष्ठे, रामदास वारीक, दत्ता देवळे, संतोष पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत नाकती व प्रस्तावीक सचिन माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी मंडणगड तालुक्यातील समस्त शाहीर कलाकार यांनी परिश्रम घेतले.