पेंडूर ग्रा. पं. च्यावतीने शवपेटीचे लोकार्पण

Edited by:
Published on: May 31, 2025 19:03 PM
views 269  views

सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 वी जयंती ग्रामपंचायत पेंडूर येथे साजरी करण्यात आली. त्या जयंतीनिमित्त पेंडूर येथील प्रितम अमर गावडे व वैभवी विलास शेट्ये या दोन उद्योजक/ व्यावसायिक महिलांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सरपंच संतोष दशरथ गावडे व उपसरपंच समक्षा सत्यवान तांडेल यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच या दिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत 15 वा वित्त आयोग मधून ग्रामपंचायतीने खरेदी करण्यात आलेल्या शवपेटीचे लोकार्पण सोहळा सरपंच संतोष गावडे यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थित सर्व  ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गावडे, प्रणिता सावंत, सुलोचना परब, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शासकिय कर्मचारी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, crp, महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.