
सावंतवाडी : न्यू इंग्लिश स्कूल मडूरा सन २००१-२००२ माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा हाय व्हेली जंगल रिसॉर्ट, बांदा या ठिकाणी आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्यात तब्बल ७० विद्यार्थी- विद्यार्थीनीं सहभागी झाले होते.
यावेळी मडूरा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वाय. जे. देसाई, त्याचबरोबर सहशिक्षक जी.के. गावडे, चंद्रशेखर नाडकर्णी, लक्ष्मण पावसकर, सूर्यकांत सांगेलकर, शिक्षिका एस. पी. कांबळे, अमिता स्वार, आदी उपस्थित होते. सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. देसाई म्हणाले की खरोखर स्नेह मेळावा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण त्यावेळी हायस्कूलचा रिझल्ट पहिल्यांदाच ६४% लागला होता त्यातील माझी एक विद्यार्थिनी पूर्णिमा गावडे मोरजकर हिने गजाल गाथण हे मालवणी पुस्तक प्रदर्शित करून एक माजी विद्यार्थी म्हणून स्कूलचे नाव सातासमुद्रपार नेलं ही गोष्ट मला अभिमानास्पद आहे असे गौरवउद्गार त्यांनी काढले. तसेच जी. के. गावडे यांनीही आपल्यातील एक विद्यार्थी आज १३० कोटी जनतेचा रक्षण करण्याकरता आपला हा स्नेह मेळावा सोडून देशाच्या सीमेवर काश्मीरमध्ये लढण्यासाठी माझा विद्यार्थी दत्ताराम गावडे गेला गेला ही सुद्धा बाप आपल्या साठी खूप महत्त्वाची आहे. तसेच श्रीमती स्वार यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. तसे त्यांना आठवणी देत असताना आनंदाश्रू अनावर झाले नाही खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तसेच लक्ष्मण पावसकर यांनी आरोग्याच्या विषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या जसं मी हायस्कूलमध्ये असतानाही माझं वजन ६४ किलो होतं ते आजही तेवढेच आहे. कारण माणसाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर माणसाला कोणतीही आजार होत नाही कारण मला आठवतं की हायस्कूलमध्ये ज्यावेळी पेज योजना चालू होती ती खूप महत्त्वाची होती कारण ते एक टॉनिक होतं. शरीरासाठी तीच ऊर्जा घेऊन आज आपण इथपर्यंत पर्यंत आलात तसेच श्रीम .कांबळे, श्री .सांगेलकर यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जे शिक्षक आपल्याला सोडून गेलेत आपल्यामध्ये नाहीत अशा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्याचप्रमाणे हीच आमुची प्रार्थना हेच आमचे मागणे हे प्रार्थना गीत सादर करण्यात आले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भारतीय सैन्य दलामध्ये असणारे श्री दत्ताराम गावडे यांनीही या स्नेह मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आणि मला पाकिस्तान भारत युद्ध होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाचा फोन आल्यामुळे मला जावं लागलं. त्यावेळी शिक्षकांनी आमचे प्रेम आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. स्वतःची काळजी घे आणि देशाचे रक्षण कर असा शुभ संदेश त्यांला दिला. तसेच शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन दत्ताराम गावडे यांचा सत्कार सुदीप गावडे यांनी स्विकारला. यावेळी विद्यार्थ्यांमधून कास गावातून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले माजी विद्यार्थी प्रवीण पंडित यांचा सत्कार मुख्याध्यापक वा.जे देसाई यांनी केला. बांदा नटवाचनालय मार्फत यावर्षीचा मालवणी साहित्यिक पुरस्कार पूर्णिमा गावडे यांना प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे सर्व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते पूर्णिमा यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षका समवेत स्नेहभोजन तसेच संगीत खुर्ची अशा विविध कार्यक्रमाने गेट-टुगेदर साजरा करण्यात आला. यावेळी गुरुदास गवंडे यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.
माजी विद्यार्थी पूर्णिमा गावडे, गुरुदास गवंडे सारिका केणी, प्रवीण पंडित, जयमाला गवस, रमेश मळगावकर, भक्ती परब, राजन धुरी, वामन गावडे, कल्याणी नाईक, पिंटो परब, रूपाली पंडित, सुषमा मेस्त्री, कल्पेश मोरजकर, जॉन गुडीनो, उमेश निगुडकर, रमाकांत भाईप, साईनाथ तुळसकर, रमेश कुडके, वैशाली पेडणेकर, अर्चना कासकर, प्रवीण मांजरेकर, सुनील गाड, प्रमिशा पंडित, शंकर करमळकर, योगेश राणे, रोहन रूबजी ,रेश्मा जाधव, शुभांगी परब, सुदीप गावडे, हिरु जाधव, शिवाजी देसाई, समीर निगुडकर, शिल्पा वेंगुर्लेकर, प्रियांका वेंगुर्लेकर, नितीन धुरी, सुजाता साळगावकर, अमोल पंडित, रेवती गवंडे, संध्या महाले, मिलिंडा रोड्रिक्स, मिलन परब, नारायण नाईक, रामा धुरी, दीपक परब, गणेश सातार्डेकर, सुदीप गावडे, दत्ताराम मेस्त्री , वर्षा धुरी, शांती गावडे, जोशना पंडित, रंजना राणे, समृद्धी पावसकर, प्रिया धुरी, सुरेखा गावडे, विठ्ठल सावंत, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सारिका केणी, पूर्णिमा गावडे यांनी केले.