
देवगड : देवगड जामसंडे शहरातील सडा शाळा येथे मद्यपान करून मद्यपनाच्या बॉटल शाळेच्या अंगणात टाकल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. देवगड तालुक्यातील तालुका कृषी कार्यालया जवळ असलेली जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा देवगड सडा ही प्राथमिक शाळा पहिली ते चौथी पर्यंत असून या शाळेत एकूण 80 विद्यार्थी शिकतात. या शाळेच्या परिसरात काही दिवसांपूर्वी दारू पिऊन बॉटल शाळेच्या आवारातच ठेवले होते. हा प्रकार तेथील शिक्षकांच्या लक्ष्यात येताच त्यांनी सोशल मिडियावर याचे फोटो व्हायरल केले होते.
याची दखल घेत मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दयानंद पाटील यांनी या शाळेला स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवून दिले आहेत. तर युथ फोरमचे अध्यक्ष एडवोकेट सिद्धेश माणगावकर यांनी आपल्या टीम सह या शाळेच्या अंगणात रात्रीच्या वेळेस गस्त घालण्यात येईल असे आश्वासन या शाळेच्या शिक्षकांना दिले आहे.