
सावंतवाडी : जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मेला भरतो. लहान मुलांसाठी ही पर्वणी असते. न.प. प्रशासन भाडेतत्त्वावर ही खेळणी लावण्यास परवानगी देते. मात्र, या ठिकाणी मुलांच्या सुरक्षितेसाठी खबरदारी घेतली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट घेत लक्ष वेधल.
दरवर्षी लहान मुलांसाठी पर्वणी ठरणारा हा मेला या ठिकाणी भरवला जातो. राज्यात अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी न घेतल्याने दुर्घटना घडल्याची उदाहरण ताजी आहेत. त्यामुळे या खेळण्यांमध्ये लहान मुलांना सुरक्षितता मिळावी अशाप्रकारे उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करत मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले. यावर तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. यावेळी उबाठा शिवसेनेचे शब्बीर मणियार, शैलेश गौंडळकर, निशांत तोरसकर, अशोक परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.