
सिंधुदुर्ग : गोव्याच्या कीर्तन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, कीर्तनसूर्य ह. भ. प. दत्तदास घाग बुवांचं जीवनचरित्र उलगडणारं 'कृष्णातिरीचा कीर्तनसूर्य‘ हे पुस्तक आज श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्तगुरूंच्या चरणी अर्पण करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे डॉ. गोविंद भगत यांनी घेतलेल्या ह. भ. प. शरदबुवा घाग यांच्या उत्स्फूर्त मुलाखतीची संकलित छापील आवृत्ती आहे.
नृसिंहवाडीचे प्रमुख पुजारी दत्तात्रय रुक्के पुजारी, दिगंबर शंकर पुजारी, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत ह. भ. प. शरदबुवा घाग, कीर्ती घाग, प्रभाकर पुजारी, रामेश्वर सावंत, गोपाळ प्रभू व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गोवा मराठी अकादमीने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता हे पुस्तक, वांते येथील चैतन्योपासना केंद्रात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे व त्यानंतर मार्च महिन्यात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.