
चिपळूण : तालुक्यातील नवविकास निर्मित नाट्यमंडळ आबिटगाव गावकरवाडी नमन मंडळाचा अमृत महोत्सव कार्यक्रम रविवार ९ रोजी पार पडला. या कार्यक्रमाला चिपळूण तहसीलदार यांनी उपस्थिती दर्शवली होती. गेली ७५ वर्षे नमन लोककला जपणारे हे नमन मंडळ असून ग्रामीण भागात त्यांनी आपल्या बोली भाषेतून आणि नमन कलेतून रसिकांची मने जिंकली. नुकताच त्यांनी आबिटगाव येथे नमनाचा अमृतमहोत्सव साजरा केला. यावेळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.
या कार्यक्रमाला चिपळूण तहसीलदार प्रवीण लोकरे हे कुटुंबासह उपस्थिती होते. यावेळी त्यांचा सन्मान माजी सभापती सुरेश खापले आणि माजी उपसभापती शरद शिगवण यांच्या हस्ते करण्यात आला. नवीन पिढी नमन कला जपत आहे ही चांगली बाब आहे. यावेळी या नमन मंडळाने सादरीकरण केले आणि सर्व रसिकांची मने जिंकली. वाडीतील जेष्ठ बाळाराम रतनु भागडे , दगडू भागडे व गावकर यांचे मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभले. या अमृत महोत्सव कार्यक्रमात पंचक्रोशीतील मान्यवरांचा आणि कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसीलदार प्रवीण लोकरे, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी सभापती सुरेश खापले, माजी उपसभापती शरद शिगवण, पुरोगामी शिक्षक संघटना, महाराष्ट्र शिक्षण संघ पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती भागडे, बंडुकांत भागडे, दत्ताराम भागडे, दीपक भागडे,लव भागडे, समीर भागडे, संतोष भागडे, देवजी खेराडे, अमित भागडे, अंकुश भागडे, गौरव भागडे, विनोद भागडे, डाॅ. हरिश्चंद्र भागडे, त्यांचे सर्व कुटुंबिय, गावकर वाडीतील सर्व ज्येष्ठ व तरुण मंडळींनी व महिला मंडळ गावकरवाडी यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे गायन अजित भागडे यांनी केले तर संगीत संयोजन अमित भागडे यांनी केले.या कार्यक्रमाची संकल्पना आणि सूत्रसंचालन दीपक भागडे यांनी केले.
आबिटगाव येथील गावकर वाडी येथे विकास निर्मिती नाट्य नमन मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त बाळाराम रतनु भागडे , दगडू भागडे व गावकर वाडीतील सर्व तरुण व जेष्ठ सहकाऱ्यांच्या वतीने सार्वजनिक सत्यनारायण महापुजेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चिपळूण तालुक्याचे तहसिलदार प्रविण लोकरे यांनी आपल्या कुटुंबासहित उपस्थित राहून मंडळाला शुभेच्छा दिल्या व प्रोत्साहित केले ..दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भागडे कुटुंबिय व गावातील सर्व जेष्ठ व तरुण मंडळींनी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. याप्रसंगी नमन हा पारंपरिक कला प्रकार जोपासणाऱ्या सर्व नमन मंडळांना मा .तहसिलदार प्रविण लोकरे , चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शरद शिगवण व माजी सभापती सुरेश खापले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . तसेच त्यांच्या हस्ते पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. नमन ही कोकणातील पारंपरिक लोककला आहे ही लोककला जिवंत ठेवणे व आताच्या युवा पिढी मध्ये ती सदैव जागृत ठेवणे या उद्देशातून आबिटगाव गावकर वाडी येथील बहुरंगी नमन हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास चिपळूण व गुहागर तालुक्यातील कलाकार व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व नमनातील कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. या नमन महोत्सवास गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल,पुरोगामी शिक्षक संघटना,महाराष्ट्र शिक्षण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. या महोत्सवाचे भव्य अशी एलईडी स्क्रीन व गणरायाचे नमनातील आगमन हे विशेष आकर्षण ठरले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती भागडे, बंडुकांत भागडे, दत्ताराम भागडे, दीपक भागडे,लव भागडे, समीर भागडे, संतोष भागडे, देवजी खेराडे,अमित भागडे, अंकुश भागडे, गौरव भागडे,विनोद भागडे, डाॅ. हरिश्चंद्र भागडे ,त्यांचे सर्व कुटुंबिय, गावकर वाडीतील सर्व जेष्ठ व तरुण मंडळींनी व महिला मंडळ गावकरवाडी यांनी विशेष मेहनत घेतली.संपूर्ण कार्यक्रमाचे गायन श्री अजित भागडे यांनी केले तर संगीत सयोजन अमित भागडे यांनी केले.या कार्यक्रमाची संकल्पना आणि सूत्रसंचालन श्री दीपक भागडे यांनी केले