कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भावी जीवन सुकर : ॲड.अजितराव गोगटे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 11, 2025 16:18 PM
views 203  views

देवगड :  कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भावी जीवन सुकर होते असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.अजितराव गोगटे यांनी व्यक्त केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे उच्च माध्यमिक प्रशालेच्या १२ वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना व्यक्त केले.

याप्रसंगी विचारमंचावर शाला समितीचे अध्यक्ष-प्रसाद मोंडकर, धनश्री गोगटे, नारायण माने , मुख्याध्यापक सुनील जाधव, जयप्रकाश पाटील, संदीप शिंगे, सुनील भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजितराव गोगटे पुढे म्हणाले की ,कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मिळतात त्यामुळे विद्यार्थी वास्तव जीवन जगतात. 

शाला समितीचे अध्यक्ष-प्रसाद मोंडकर यांनी परीक्षेपूर्वी व परीक्षेदरम्यान काय करायला पाहिजे याचे सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत व संघर्ष यांच्या जोरावरच यशाची फळे चाखता येतात असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी गुरुदक्षिणा म्हणून १२ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेसाठी एक स्टैंड फॅन मुख्याध्यापक व शाला समितीचे अध्यक्ष प्रसाद मोंडकर यांच्याकडे सुपूर्त केला.  याप्रसंगी माजी मुख्याध्यापक नारायण माने यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रस्ताविक व आभार सुजित फडके, सूत्रसंचालन संदीप शिंगे यांनी केले.