
वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा- न्हैकरवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव चावडीच्या चाळ्याचा जत्रोत्सव उद्या रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत भाविकांची वार्षिक राखण देणे व नवस फेडणे तर दुपारी २ ते ४ या वेळेत भोजन प्रसाद कार्यक्रम होणार आहे.
यानंतर सायंकाळी ७ वाजता श्री देव चव्हाटा मंदिर नजीक चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कारीवडे यांचा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.