LIVE UPDATES

फणसगाव - विठ्ठलादेवीमधील श्री रवळनाथाचा वर्धापनदिन ८ फेब्रुवारीला

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 08, 2025 14:51 PM
views 281  views

देवगड : देवगड तालुक्यातील फणसगाव व विठ्ठलादेवी गावातील श्री रवळनाथाचा ११ वा वर्धापन दिन व श्री देव महादेव, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी महाकाली प्रथम वर्धापन दिन कार्यक्रम बुधवार दि.८ फेब्रुवारी ते बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला. यानिमित्त विविधा धार्मिक व सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त शनिवार दि.८ फेब्रुवारी रोजी श्री देव महादेव मंदिरात रात्रौ १० वा नामांकित ढोलपथकाची जुगलबंदी, रविवार दि.९ फेब्रुवारी रात्रौ १० वा श्री देवी महालक्ष्मी मंदिरात २०×२० डबलबारीचा जंगी सामना बुवा संदिप पुजारे,(नाडण देवगड) विरुध्द संतोष जोईल,(खुडी देवगड), सोमवार दि.१० फेब्रुवारी श्री देवी महाकाली मंदिर येथे सायं ६:३० ते ९ वा. एकात्मता वारकरी संपद्राय कोकण दिंडी हरिपाठ,रात्रौ १० वा.आई भगवती दिंडी भजन मंडळ, तोरसोळे याचे भजन, शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी श्री रवळनाथ मंदिरात सायं ६ पासून स्थानिक भजने व पालखी मिरवणूक,मंगळवार दि.१८ फेब्रुवारी राजी रात्रौ १० वा सखी फुगडी संघ, पावशी यांची फुगडी, बुधवार दि.१९ फेब्रुवारी रात्रौ १० वा २० × २० डबलबारीचा जंगी सामना बुवा प्रविण सुतार,पुरळ-देवगड विरुध्द बुवा गौरव पांचाळ,संगमेश्वर -रत्नागिरी यांच्यात होणार आहे.

तसेच सर्वच मंदिरात वरील दिवशी स्थापीत देवतांची पुजा,होम, अभिषेक, विविध विधी,अल्पोपहार, महाप्रसाद, आरती व पालखी मिरवणूक,ढोलवादन, स्थानिक भजने होणार असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी व श्री महादेव सेवा मंडळ,मुंबई-ग्रामीण व उत्सव समिती,फणसगाव व विठ्ठला देवी यांच्यावतीने करण्यात आले आहे.