गुरुनाथ डांगी, इसाक खेडेकर यांचा दोडामार्ग पोलीस निरीक्षकांच्या हस्ते गौरव

Edited by:
Published on: February 06, 2025 19:41 PM
views 142  views

दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाणे अंतर्गत शांतता कमिटी सदस्य गुरुनाथ डांगी, इसाक खेडेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे गुरुनाथ डांगी, इसाक खेडेकर यांचा दोडामार्ग पोलीस ठाणे निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याहस्ते प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.


दोडामार्ग पोलीस ठाणे अंतर्गत शांतता कमिटी सदस्य गुरुनाथ डांगी, इसाक खेडेकर हे कार्यरत असुन या दोहोंनी  वेळोवेळी  विशेषतः कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या परिस्थिती तसेच अचानक उद्भवलेल्या घटनेवेळी, जातीय तणावाची परिस्थितीत व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल(भा.पो.से.) अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले) (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी  विनोद कांबळे, दोडामार्ग पोलीस ठाणे निरीक्षक निसर्ग ओतारी यांसह सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून सेवाभावनेने समर्पित केलेल्या योगदानाबद्दल डांगी व खेडेकर यांचे कौतुक करून प्रशंसापत्र देऊन दोडामार्ग पोलीस ठाणे निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले. तसेच भविष्यातही असेच सर्वोत्कृष्ट कार्य करून पोलीस दलास सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त शुभेच्छा दिल्या.