सावंतवाडी : प्रत्येक गावातील देवस्थान उपसल्लागार समितीची निवड गावच्या ग्रामसभेत न करता गावऱ्हाठीनुसार गावसभेत करण्याच्या सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश आले आहे. कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यासाठी सहमती दर्शविली आहे. बुधवारी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री. नाईकवडे आणि सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल. एम. सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सदस पंढरीनाथ पु राऊळ (सांगेली), चंदन धुरी (कोलगाव), सुभाष गावडे (चौकुळ), मधुकर देसाई (डेगवे,) विलास सावंत, यशवंत सावंत (डिंगणे), लक्ष्मण परब (चराठा), वसंत धुरी (सातोसे), शिवराम सावंत, नारायण राऊळ (शिरशिंगे) मंथन गवस (वाफोली) आनंद परब (मडूरे), यशवंत सावंत तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे कायदेविषयक सल्लागार अँड. ख्वाजा आदी उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री नाईकवडे यांनी देवस्थान उप समित्यांचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या या निर्णयाचे स्वागत केले.