बांदा केंद्र शाळेच्या युवराज नाईकची बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Edited by:
Published on: February 05, 2025 18:08 PM
views 256  views

बांदा :  राष्ट्रीय आविष्कार अभियान सन २०२४ - २५ या उपक्रमांतर्गत Exposure Visit Outside State हा अभ्यासदौरा बेंगलोर - म्हैसूर - कर्नाटक येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या आयोजित केला. या राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील इयत्ता सातवी इयत्तेतील युवराज मिलींद नाईक याची निवड झाली आहे.

जिल्ह्यातील ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत व ज्या शाळेचे विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती मध्ये सर्वोत्तम आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षिस देण्यासाठी हा अभ्यासदौरा राज्याबाहेरच्या स्थळांना भेटी देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे .  ४ते ९फेब्रुवारी२०२५ या  दरम्यान संपन्न होणाऱ्या अभ्यास दौऱ्यात  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळातील एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत . अभ्यास दौऱ्यात विविध शैक्षणिक - अध्यात्मिक - विज्ञान -तंत्रज्ञान व कलात्मक तसेच निसर्गरम्य स्थळांना भेटी आयोजित करण्यात आल्या आहेत.

      युवराज मिलींद यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक शांताराम असनकर  यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपशिक्षक जे.डी.पाटील व पदवीधर शिक्षक उदय सावळ यांनी युवराजला रोख  रक्कम बक्षीस देऊन सन्मानित केले. युवराजला वर्गशिक्षका कृपा कांबळे,रसिका मालवणकर, स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस,जागृती धुरी , मनिषा मोरे, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.