विजेच्या धक्क्याने गुराखीसह गायीचा मृत्यू !

Edited by: मनोज पवार
Published on: July 19, 2024 11:50 AM
views 120  views

खेड : कोकणात अतिवृष्टी होत असून गेल्या चोवीस तासात सुमारे १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद खेड तालुक्यात झाली आहे. तालुक्यातील मौजे तिसंगी बर्गेवाडी येथे आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. महावितरणच्या पोल वरील वायर तुटून खाली पडलेली असताना एक गुराखी व तिच्या गाईला विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच खेडचे सहायक पोलिस निरीक्षक श्री नावले, पोलिस उपनिरीक्षक श्री केंद्रे घटनास्थळी रवाना झाले आहेत. अधिक तपशील समजू शकलेला नाही.