
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून चराठा जिल्हा परिषद शाळेसह, सरमळे, ओटवणेतील रवळनाथ विद्यामंदिर हायस्कूल, जिल्हा परिषदच्या चारही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ प्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ चराठा येथे पार पडल्यानंतर रवळनाथ विद्या मंदिर हायस्कूल ओटवणे येथे वाटप करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी रवळनाथ विद्यामंदिर येथे स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गेळे सरपंच संदिप ढोकरे, तानाजी गावडे,सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, सामजिक कार्यकर्ते उमेश गावकर, अजय सावंत, माजी पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर, सरमळे सरपंच विजय गावडे आदीसह शिक्षक वृंद, स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. ओटवणे हायस्कूल येथे वह्या वाटप प्रसंगी शाळेच्या वतीने हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी संदीप गावडे यांचे शाळा आणि विद्यार्थांच्या वतीने आभार मानले.