चिंतामणी मडव यांचा शिवसेनेशी संबंध नाही : गुणवंत सावंत

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 31, 2024 09:26 AM
views 332  views

कुडाळ : जांभवडे गावातून काल ज्या एकमेव व्यक्तीचा प्रवेश घेत वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर टीका करायला लावली त्या चिंतामणी मडव व शिंदे शिवसेनेचा काहीही संबंध नसून ते मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना ग्रामपंचायत निवडणूक शिंदे शिवसेनेने फक्त पाठिंबा दिला होता. 

मात्र त्या निवडणुकीत चिंतामणी मडव यांच डिपॉझिटही जप्त झाल त्यानंतर कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमात ते सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसून चिंतामणी मडव हे आमचे कार्यकर्ते नाहीत अशी माहिती शिंदे शिवसेनेचे आंब्रड जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख गुणवंत सावंत यांनी दिली आहे.