दापोली : महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठा, आनंदाचा नाही तोटा अशा आनंदी सणासाठी दापोली तालुक्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झालेल्या असतानाही एकीकडे किल्ले तयार करणे,आकाश कंदील लावणे, फटाक्यांची आतषबाजी करणे हे सुरु असतांना सुद्धा दापोली विधानसभा क्षेत्रात स्वीप अंतर्गत मतदार जागृती करणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व स्विफ्ट नोडल ऑफिसर तथा गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थिनी दिवाळीचा फराळ व रांगोळी मधून मतदारांना मतदान जागृतीसाठी संदेश देत कर्तव्याचा एक वेगळा आनंद देत असल्याचे दिसत आहे.
मुले आपल्या आईवडिलांना पत्ररुपी भेटकार्ड देऊन पालकांचे प्रबोधन करीत असून, आईसोबत तयार करत असलेल्या करंजीसारख्या फराळावर, तसेच अंगणातील रांगोळीतून मतदान जागृती संदेश देऊन मतदानाचे महत्व सांगत असल्याचे स्विपचे विधानसभा नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.