
चिपळूण : लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पेढे येथील सामाजिक कार्यकर्ते व चिपळूण तालुका पांचाळ, सुतार समाजाचे अध्यक्ष आणि ओबीसी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सदाशिव खोपडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे.
लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही संस्था भारतभर ग्राहक संरक्षणाचे काम करीत आहे. त्यामध्ये उपभोक्ता संरक्षण कल्याण अधिकार, अधिनियम १९८६/२०१९ प्रमाणे चंद्रकांत खोपडकर यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदावर निवड़ करण्यात आली आहे.
लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिनकर म. आमकर यांनी खोपडकर यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे वृत्त समजताच रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागातून खोपडकर यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. श्री. खोपडकर हे सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. समाजात काम करताना त्यांनी तळागाळातील लोकांची त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल सुतार समाज ओबीसी जनमोर्चा समिती सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.