
दोडामार्ग : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग गोवा चेक पोस्टवर आज सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई करत वाहनासह एकूण 23 हजार 600 रु मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र दोडामार्ग पोलिसांचे वरातीमागून घोडे असल्याचे चित्र आज दिसून आले.
याबाबत अधिक माहिती आशिकी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग गोवा सेमवर दोडामार्ग चेक पोस्ट घालण्यात आले आहे. यां ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक येथे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. राज्यात आचारसंहिता लागल्या नंतर ठिकठिकाणी चेकपस्ट बसवण्यात आले आहेत. तसेच देशी विदेशी दारू पूर्णता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. तसे असताना देखील राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक ऋषिकेश रावले यांनी दोडामार्ग पोलिसांनी कल्पना न देता भेट दिली. त्यावेळी त्यांनी गोव्यातुन येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली. त्यांना विना परवाना गोवा बनावटीची दारू आढळून आली.
जिल्ह्याचे पोलीस अधिकारी येऊन दोडामार्गला गोवा बनावटीच्या दारुवर कारवाई करतात त्यांचे अभिनंदनच. मग दोडामार्ग पोलीस काय करतात? अशा चर्चा आता बाजारात होऊ लागल्या आहेत. दोडामार्ग पोलीसांच्या आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू घाट माथ्यावर वाहतूक केली जात आहे. याही दारुवर जिल्हा पोलीस निरीक्षक यांनी लक्ष घालावं अशी मागणी जनतेतून होतेय.
बांदा येथे आठवडा भरापूर्वी दारू वाहतूक करणाऱ्या कारचा जो प्रकार घडला त्यानंतर बांदा येथे मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन विभागाने दारू वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. अशाच प्रकारे दोडामार्ग तालुक्यातून दिवसा ढवळ्या गोवा बनावटीची दारू कर्नाटक कोल्हापूर या सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. मग बांद्याची पुनरावृत्ती घडल्या नंतर या दारू वाहतुकीवर कारवाई होणार काय? असे सवाल विचारले जातायत.
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर होतो. हा पैसा हवाला मार्ग पोहोचविला जातो. शिवाय मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातील बेकायदा मद्य तस्करीही होते. त्यामुळे तपासणी नाके सुरू झाल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता असते. आचारसंहितेनंतर तालुक्यातील एकाही सीमा तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात येथील पोलिसांना यश आले नाही. मात्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले यांनी दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी केली व अवैध दारू पकडली. या कारवाईमुळे दोडामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कारवाई नंतर दोडामार्ग पोलीस जागे
अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांनी दोडामार्ग चेक पोस्टवर गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई केल्यानंतर दोडामार्ग पोलीस खडबडून जागे झाले असून सर्व वाहनांची तपासणी करीत आहेत.