मनिषला, पोलीस दलाच्या "मायलो" श्वानामुळे नवा जन्म

खानोलीच्या जंगलात शोधमोहिमेचा थरार
Edited by: दीपेश परब
Published on: April 30, 2026 23:13 PM
views 126  views

वेंगुर्ले : नशीब बलवत्तर आणि नियतीची साथ असली की माणूसही मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येतो. याचाच प्रत्यय वेंगुर्ले तालुक्यातील खानोलीत आला. कणकवली, कसवण तळवडे येथील २३ वर्षीय मतिमंद युवक मनिष जयेश राऊळ जो सलग ३ दिवस अन्न पाण्याविना बेपत्ता होता. त्याला सिंधुदुर्ग पोलीस दलातील "मायलो" या श्वानाने शोधून काढत नवा जन्म दिला. 

   मनिष हा मतिमंद असून त्याला चालता व बोलताही येत नाही. मनिष आपल्या कुटुंबियांसह खानोली तळेकरवाडी येथे २५ एप्रिल रोजी आपल्या मावशीच्या घरी आला होता. २६ एप्रिल ला सायंकाळी ४.३० वाजता तो अचानक नापत्ता झाला. यानंतर तो शोधाशोध करूनही न मिळाल्याने कुटुंबीयांनी वेंगुर्ले पोलिसात धाव घेत नापत्ता दाखल केले. तब्बल ३ दिवस नापत्ता असलेल्या मनीषा शोध घेताना ग्रामस्थ, नातेवाईक आणि आधुनिक ड्रोन कॅमेरे ही हतबल झाले होते. खानोलीच्या जंगलातील खनदाट झाडी व काळोख्या रात्री मुळे मनीष च्या जगण्याची आशा दुसर होत चालली होती. 

   अशावेळी मदतीला धावून आले ते सिंधुदुर्ग पोलिसांचे श्वान पथक. मनीष च्या कपड्याचा वास मिळताच "मायलो" नावाच्या श्वानाने जंगलाच्या वाटा शोधल्या आणि तब्बल ३ किलोमीटरच्या अंतरावर अचूक माग काढत मनिषला नवसंजीवनी दिली. मनिष शेजारील जंगलातच ओहोळामधील खडकाळ भागात आढळुन आला. या घटनेबद्दल सिंधुदुर्ग पोलीस दलातील श्वानपथकाचे कौतुक होत आहे. तंत्रज्ञानाची मर्यादा जिथे संपली तिथे एका मुक्या जीवाच्या तीक्ष्ण नाकाने मनिषचा शोध घेतला. खानोलीच्या जंगलात झालेला हा शोधमोहिमेचा थरार झाला. मनीषा आता कुटुंबाच्या ताब्यात सुरक्षित आहे. 

    श्वानपथक सिंधुदुर्गचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरजकर, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सराफदार, वेंगुर्लेकर, चालक कोयंडे तसेचे वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे यांनी घटनास्थळी श्वान मायलो च्या साहाय्याने मनिषचा शोध घेतला.