बारावी २०२६ निकाल २ मे रोजी ऑनलाईन जाहीर होणार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 30, 2026 23:32 PM
views 21  views

सिंधुदुर्गनगरी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांतर्गत घेतलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विविध अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक (Seat Number) आवश्यक राहील.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

results.targetpublications.org

results.navneet.com

विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांची डिजिटल प्रत DigiLocker App वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांमार्फत अधिकृत निकालाची प्रत मिळू शकते.

पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रत (Photocopy) :

निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी ठराविक कालावधीत अर्ज करणे आवश्यक असून शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

Class Improvement योजना :

फेब्रुवारी–मार्च २०२६ परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी (Class Improvement Scheme) पुढील तीन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विशेष बाब :

जून–जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पूरक परीक्षेसाठीही अर्ज प्रक्रिया स्वतंत्रपणे ऑनलाइन राबविण्यात येणार आहे.

मंडळाने विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.