अन्नपूर्णा कोरगावकर पिंजून काढतायत शहर

नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2025 14:41 PM
views 64  views

सावंतवाडी : नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचार केला. आपल्या समर्थकांसह त्यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे.


यावेळी त्यांच्यासोबत अवधूत नाटेकर, अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, व्यंकटेश शेठ, विनिता नाटेकर, एलिडा डिसोजा, शितल डिसोजा, आदींनी प्रचारात सहभाग घेतला. सौ. कोरगावकर म्हणाल्या, लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. लोक सांगत असलेल्या समस्या ऐकत आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा भर असणार आहे. प्रचाराला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे‌. जनता माझ्या सोबत असून माझा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.