
सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी झंझावाती प्रचारास सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार आनंद नेवगी व मोहिनी मडगावकर यांच्यासमवेत त्यांनी घरोघरी प्रचार केला.
कार्यकर्त्यांची साथ, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. या प्रभागातून मोठ मताधिक्य आम्हाला मिळेल असा विश्वास युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार माजी नगरसेवक आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, रविंद्र मडगावकर, राघवेंद्र चितारी, गौरव दळवी आदी उपस्थित होते.










