
वेंगुर्ले : मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत वायंगणी आणि एसएसपीएम हॉस्पीटल पडवे याच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती वेंगुर्ला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीराला उत्सुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात ९२ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या यामध्ये हृदयरोग तपासणी(ECG) तसेच नेत्र तपासणी इतर जनरल तपासणी करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील ३० दिव्यांग व्यक्तींना आराम खुर्चा वाटप करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबांना स्वच्छेतेच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबांना एक टॉयलेट ब्रश आणि एक फिनॉल बॉटल वाटप करण्यात आले.
गावामध्ये सर्व घटकांचा विचार करून विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत वाटचाल करत आहे आणि याचे सर्व श्रेय गावातील लोकांना देत असल्याचे सरपंच दत्ताराम उर्फ अवि दुतोंडकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, उपसरपंच रविंद्र धोंड, ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराठकर, ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर, अनंत केळजी, महेष मुणनकर, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड विद्या कांबळी, वायंगणी पोलिस पाटील स्वप्नाली मसुरकर, तळेकरवाडी पोलिस पाटील समिधा धुरी, माजी ग्राम पंचायत सदस्य भिकाजी गावडे, आरोग्य विभाग कर्मचारी, सिआरपी उपस्थित होते










