
दोडामार्ग : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दोडामार्ग येथील कार्यकर्ते संदेश वरक यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याची माहिती जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
धुरी यांनी सांगितले की, “संदेश वरक हे खरे शिवसैनिक आहेत. त्यांना झालेल्या काही गैरसमजुती आम्ही स्पष्ट केल्या असून आता ते पक्षाचे सर्व नियम व अटी पाळून नियमितपणे काम करतील,” असे धुरी यांनी स्पष्ट केले आहे.










