सिद्धिविनायक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव खाडये

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 18, 2025 20:28 PM
views 15  views

कणकवली : तालुक्यातील कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कासार्डे येथे माजी जि. प. सदस्य तथा सल्लागार संजय देसाई याच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सहदेव खाडये यांची निवड करण्यात आली.


यावेळी उपाध्यक्षपदी अभिजीत शेटये, राकेश मुणगेकर, सचिव सचिन राणे, सहसचिव रूपेश कानसे, खजिनदार राहूल उर्फ राजू शेटये, सहखजिनदार वैभव माळवदे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य व सल्लागार यांना कायम ठेवण्यात आले. 

यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच वर्षभर सामाजपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस नितीन उर्फ पप्या लाड, श्रीपत पाताडे, राजेंद्र सावंत, सुधाकर रावले, रमेश मुणगेकर, गुरूप्रसाद सावंत, डॉ.किरण गुजर, प्रविण पोकळे, सुधीर रजपूत, विद्याधर नकाशे यांच्यासह सल्लागार, सभासद व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.