
देवगड : देवगड वाडातर गावातील अक्षता वाडेकर यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेत खाजगी उद्देशाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या गोपनीयतेला धोका निर्माण झाला आहे. हा कॅमेरा त्वरित काढावा, अशी मागणी वारंवार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने, येत्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा अक्षता वाडेकर यांच्या सह ग्रामस्थानी दिला आहे.
अक्षता वाडेकर यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेत खासगी उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्याने त्यांच्या व गावातील आजूबाजूच्या लोकांच्या गोपनीयतेला धोका निर्माण झाला आहे. हा कॅमेरा त्वरित काढावा, अशी मागणी वारंवार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने, येत्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा अक्षता वाडेकर यांच्या सह ग्रामस्थानी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कॅमेऱ्यात त्यांच्या घरातील तसेच अंगणातील हालचालींचे चित्रीकरण होत असून, यासंदर्भात एप्रिल २०२५ मध्ये देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी हा कॅमेरा मेरीटाईम बोर्ड हद्दीत असल्याचे सांगून जबाब नोंदवला. तसेच पारदर्शकता कमी केल्याचा दावा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील पोलिस पाटील हे कॅमेऱ्याचा गैरवापर करून सुरक्षिततेला धोका पोहोचवत असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच, या प्रकरणाची झळ आपल्या पदावर येऊ नये म्हणून पोलिस पाटील यांनी गावातील अध्यक्ष पुष्पकांत वाडेकर यांच्यासह ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेतल्या व प्रशासनाला दिशाभूल करणारा वेगळा अर्ज सादर केल्याचही ग्रामस्थांच म्हणणं आहे.अक्षता वाडेकर यांनी अनधिकृत गाडी पार्किंग हटविणे,कॅमेऱ्याचे फुटेज तपासणे,तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्यदिनी महिलांसह ग्रामस्थांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.